राखी पाठवायची आहे चिंता करू नका ; पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 29, 2020

राखी पाठवायची आहे चिंता करू नका ; पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था


राखी पाठवायची आहे चिंता करू नका ; पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था
माणदेश एक्सप्रेस न्युज

सांगली : राखीचा सण सोमवार, दि. 3 ऑगस्ट रोजी असल्यामुळे डाकघर सांगली विभागाने रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. 

राखी टपालाची प्राधान्यक्रमानुसार बुकिंग प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आली आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर सांगली, मिरज, जत, इस्लामपूर, तासगाव येथेही सुरू करण्यात आले आहेत. प्राधान्यक्रमाने व वेळेत राखी टपालाच्या वितरणासाठी लोक स्पीड पोस्ट सेवा वापरू शकतात. अशी माहिती सांगली डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक ए. आर. खोराटे यांनी दिली.

कोविड काळात पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे आणि स्पीड पोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद होईल अशी अपेक्षा श्री. खोराटे यांनी व्यक्त केली आहे.


No comments:

Post a Comment

Advertise