एका कारखान्याचे 'एमडी' सहित काही 'कर्मचारी' संस्था विलगीकरण कक्षात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 12, 2020

एका कारखान्याचे 'एमडी' सहित काही 'कर्मचारी' संस्था विलगीकरण कक्षात


एका कारखान्याचे 'एमडी' सहित काही 'कर्मचारी'  संस्था विलगीकरण कक्षात
माणदेश एक्सप्रेस न्युज
मंगळवेढा/प्रतिनिधी : मंगळवेढा येथील गुंगे दत्तू गल्लीतील एकाचा रिपोर्ट कोरोनाग्रस्त म्हणून आल्यानंतरचा सदरचा भाग (गल्ली) सील केलेला आहे. ही कोरोनाग्रस्त व्यक्ती एका कारखान्यात कर्मचारी असल्याने, त्या अनुषंगाने कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांच्या ऑफिसमधील स्टाफ सहकारी यांना मंगळवेढा येथील मोहिते-पाटील सायन्स कॉलेजमध्ये संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये सोशल डिस्टस्निग पाळून हे कर्मचारी योगा अभ्यास, संवाद, कथासार यावर वर्ग चालू असून, येणाऱ्या संकटावर प्रत्येकाने कशी मात केली पाहिजे, यावरही चर्चा सत्रे चालू आहेत. आहार-विहार, योगासने, विनोद, जीवन जगण्याची शैली, यावर विचारमंथन दररोज सकाळ, संध्याकाळ होत असून प्रतिकारशक्ती वाढवणे हाच मुख्य हेतू ठेवून दिनक्रम चालू असतो.दररोज मसाला युक्त काढा त्यांना दिला जातो.
आपण महामारी रोगासाठी क्वारंटाईन झालो याची जाण न राहता, एक ट्रेनिंग सेंटर असल्याचे भासवते. कारखान्याचे चिफअकाउंटंट आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ, एकाच ठिकाणी सोशल डिस्टस्निग पाळून ठेवल्यामुळे, ते तणावमुक्त असून प्रतिकारशक्ती वाढवण्याची चर्चासत्रे चालवणे शक्य झाले आहे. तालुक्याचे युवा नेते, कारखान्याचे चेअरमन, समाधान आवताडे यांनी विशेष लक्ष दिल्याने, या क्वारंटाईन लोकांचे मानसिक मनोबल वाढलेले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise