वाणीचिंचाळे येथे दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने स्वंयपुर्तीने आंदोलन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 21, 2020

वाणीचिंचाळे येथे दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने स्वंयपुर्तीने आंदोलन


वाणीचिंचाळे येथे दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने  स्वंयपुर्तीने आंदोलन
माणदेश एक्सप्रेस न्युज
घेरडी/वार्ताहर : सध्या शेतकऱ्यांच्या दूधाला पाण्याच्या दराने दुध स्विकारणे चालू आहे. परंतु दूध उत्पादक शेतकऱ्यांना पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दूध दर अतिशय कमी दराने घेतले जात आहे. यामुळे उत्पादन खर्च व नफा यामध्ये ताळमेळ घालणे शक्य नाही. यामुळे शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय सुरू केला. परंतु सध्याच्या काळात या दूध व्यवसायाला घरघर लागली आहे.
वाणीचिंचाळे गावात सध्या दररोज 10000 हजार दुध संकलन होत आहे परंतु या व्यवसाय सध्या आतबटटयाचा ठरत आहे. कोणतेही सरकार असुद्या शेतकऱ्यांना दूधाला रास्त 35 रु. दर मिळावा अशी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. तरच शेतकरी जगेल अन्यथा दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागेल. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी स्वंयपुर्तीने सर्वपक्षीय दूध ओतून निषेध नोंदवला. तसेच यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आंदोलन करण्यात आले. अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांनी आंघोळ करून निराळे आंदोलन केले. तसेच जर दूधाला योग्य भाव मिळाला नाही तर आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

सरकार कोणतेही असो दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम कायमस्वरूपी होत आले आहे. परंतु आतापासून शेतकऱ्यांनी स्वंयपुर्तीने आंदोलन करून सरकारला जागे करून दूधाला किमान 35 रु. दर दयावा तरच दूध घातले जाईल अन्यथा एक थेंबही दूध घातले जाणार नाही.
दत्तात्रय टेकनर
दूध उत्पादक शेतकरी

जोपर्यंत दूधाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत दूधाचा संप चालू राहणार आहे. तसेच सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. तसेच गावातील खाजगी व सहकारी दूध संस्थानी शेतकऱ्यांना सहकार्य करून हे आंदोलन यशस्वी करावे.
बंडु सोपे
मा.ग्रा.पं.सदस्य 

No comments:

Post a Comment

Advertise