हिंगणीत पशुवैद्यकीय डॉक्टरसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 30, 2020

हिंगणीत पशुवैद्यकीय डॉक्टरसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे


हिंगणीत पशुवैद्यकीय डॉक्टरसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे  
माणदेश एक्सप्रेस न्युज

म्हसवड/अहमद मुल्ला : हिंगणी ता.माण येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी विशेष कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब कोळी यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,पशुसंवर्धन मंत्री व सातारा जिल्हा पालकमंत्री यांचेकडे ईमेल द्वारे केली आहे.

हिंगणी गावामध्ये दुधाळ गायीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे सोबतच गायी, म्हैस, खिलार गायी, शेळी, मेंढी यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या ठिकाणी जनावरांना अचानक काही झाल्यास कोणताही सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक जनावरे दगवलेची घटना घडल्या आहेत आणि शेतकरी वर्गांचे खूप मोठे नुकसान होत आहे. 

हिंगणी हे गाव म्हसवड देवापुर पशु दवाखाना अंतर्गत येत असते परंतु याठिकाणी असणारे डॉक्टर हिंगणी मध्ये कधी आलेच नाहीत त्यामुळे पशुधन वाचवण्याकरिता शेतकऱ्यांना खूप मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

 सरकारी नियमानुसार जनावरांचे उपचार केल्यास निश्चितच शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जनावरांना उपचार घेता येतात तरी संबंधित विभागाने तातडीने म्हसवड देवापूर अंतर्गत असलेल्या हिंगणी गावामध्ये सर्वाधिक जनावरांची संख्या आहे. 

याठिकाणी दररोज साधारण पंधरा हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे व इतर जनावरे वेगळीच आहेत एवढी मोठी संख्या असताना देखील शेतकऱ्यांच्या पदरी डॉक्टर विना निराशाच आहे. आजची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या दुधाला कोणतीही किंमत नाही दुधाचे दर पडल्यामुळे शेतकरी खूपच अडचणीत आलेला आहे. 

यात पाऊस सुरू असल्याने जनावरांना कोणत्या ना कोणत्या आजाराची लागण होत आहे. त्यामुळे या जनावरांचा देखभालीचा खर्च खाजगीतुन शेतकऱ्यांना करावा लागत असून तो शेतकर्यां ना परवडणारा नाही. म्हणून शासनाने त्वरित या हिंगणी गावासाठी तातडीने स्वतंत्र पशुसंवर्धनचा डॉक्टर नेमून शेतकऱ्यांची होत असलेली अडचण दूर करावी अशी मागणी विशेष कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब कोळी यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment

Advertise