रामदेव बाबांचा तो कांगावा खोटा.....!!! - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 4, 2020

रामदेव बाबांचा तो कांगावा खोटा.....!!!


रामदेव बाबांचा तो कांगावा खोटा.....!!!
रामदेव बाबा व पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांनी दिनांक 23 जून, 2020 रोजी एका मोठ्या पत्रकार परिषदेमध्ये कोरोनील व श्वासारी या दोन आयुर्वेदिक औषधी गोळ्या मुळे कोरोना सारखा संसर्गजन्य रोग  100% बरा होऊ शकतो, असा दावा केलेला आहे. याची गंभीर दखल घेत, 'आयुष मंत्रालयाने 'या औषधाबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. आम्ही पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीला सदर औषध तपासणी करण्यासाठी पाठवणे बाबत नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर या औषधाची संपूर्ण माहिती, त्याबद्दलचे केलेले संशोधन, या औषधाची किती रुग्णावर क्लिनिकल ट्रायल घेण्यात आली आहे? ही ट्रायल कोणत्या दवाखान्यात किंवा वैद्यकीय संस्थेत घेण्यात आली? तसेच या औषधाची नोंद  CTRI कडे करण्यात आली आहे का? या संबंधीची सर्व माहिती पतंजली आयुर्वेद कंपनीकडून मागवली.
उत्तराखंड मध्ये covid-19 वर आयुर्वेदिक औषध शोधण्यासाठी त्यांना कोणता परवाना देण्यात आला आहे?  त्याची प्रत ही आयुष मंत्रालयाने मागितली आहे. एखाद्या आयुर्वेद कंपनीने जर एखादे आयुर्वेदिक औषध नव्याने बनवले असेल, तर त्याची ' फुड्स ॲड ऍडमिनिस्ट्रेशनला ' नोंद करणे, आवश्यक असते.आयुर्वेदिक औषध बनविण्यास परवानगी देणाऱ्या उत्तराखंड आयुर्वेद विभागाच्या लायसन्स अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, 'आम्ही पतंजली आयुर्वेद कंपनीला फक्त रोगप्रतिकारक क्षमता, ताप आणि खोकला यासाठी औषध बनवण्याचे लायसन्स दिलेले आहे. त्यांनी आमच्याकडे कोरोना संबंधी औषधाचा कोणता ही उल्लेख केलेला नाही. त्यानंतर पतंजली आयुर्वेद औषध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आचार्य बालकृष्ण यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की पतंजली च्या वतीने असा दावा केला नाही की, कोरोनील हे औषध कोरोना वरचा इलाज आहे की, ज्यामुळे कोरोना रोग नियंत्रित होतो. आम्ही पत्रकार परिषदेत असे म्हणालो की," आम्ही या औषधाची चाचणी घेतली आणि त्यात असं आढळलं की कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत, यात काही संभ्रम असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."तसेच रामदेव बाबांनी ही आपण कोरोणावर औषध बनवल्याचा दावा केलाच नाही, असे म्हणून हात झाडून मोकळे झालेले आहे.
   अशा प्रकारचे औषध शोधण्याचा खोटा दावा करणे किंवा त्या औषधाचा प्रचार प्रसार करणे हे ड्रग्स ॲड मॅजिक रेमेडीज 1954 या कायद्याचा भंग आहे तसेच कोव्हीड उद्रेकानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांचा भंग होत आहे. त्यामुळे दोन्ही कलमाच्या आधारे रामदेव बाबांना व त्यांच्या कंपनीला शिक्षा केली जाणार का हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तसेच जर हा दावा खोटा असेल तर रामदेव बाबांच्या पतंजली उद्योग समूहाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूच्या निर्मिती पाठीमागे आयुर्वेद आहे, हा दावा पूर्णपणे खोटा ठरतो. कारण अगदी खाण्या-पिण्याच्या वस्तू पासून, सौंदर्यप्रसाधने, शेती वरील औषधे, मानवाच्या वेगवेगळ्या आरोग्यावरील औषधे इत्यादी रामदेव बाबाच्या पतंजली उद्योग समूहाच्या माध्यमातून बनवली जातात. या प्रत्येक वस्तूंच्या माध्यमातून रामदेव बाबा दावा करतात की, 'या वस्तू आयुर्वेदिक आहेत, त्यांच्या वापरामुळे मानवाच्या शरीरात असणारे सगळे विकार आपोआप नष्ट होतात.' या सर्व व वस्तुंचा प्रचार व जाहिरात रामदेव बाबांनी अशाच पद्धतीने केलेल्या असण्याची शक्यता आहे तसेच त्यांना केंद्रामध्ये सत्तेवर असणाऱ्या व उत्तराखंड मध्ये सत्तेवर असणाऱ्या राजकारणी लोकांचेही मोठे पाठबळ मिळालेले असणार आहे. त्यांच्या बळावरच रामदेव बाबांनी गडगंज माया गोळा केली आहे. अमेरिकन कंपनीच्या नेसले मॅगी मध्ये आळ्या निघाल्यानंतर रामदेव बाबांनी स्वदेशी मॅगी चे उत्पादन करायला सुरुवात केली तेव्हापासून ते आजपर्यंत अनेक प्रकारची उत्पादने करून त्यांना आयुर्वेद, देव व धर्माची  पॉलिश करून भारतातील भोळ्याभाबड्या जनतेच्या मस्तकी मारला व व गडगंज माया गोळा केली. दिल्लीमध्ये हे तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात आंदोलनासाठी बसलेल्या रामदेव बाबांची जेव्हा पोलिसांनी पिटाई करायला सुरुवात केली, तेव्हा हेच रामदेव बाबा साडी नेसून महिलेच्या वेशात पोलिसांचा मार वाचवण्यासाठी सैरभैर होऊन पळत होते. त्यानंतर काँग्रेसची सत्ता गेली व भाजपची सत्ता आले याची मोठी लॉटरी रामदेव बाबांना लागली असावी. त्यामुळेच रामदेव बाबा व त्यांचा पतंजली उद्योग समूह अल्प कालावधीतच भरभराटीस गेला असावा. कारण रामदेव बाबा सरकारचे व व सरकार रामदेव बाबांचे असेच सूत्र जुळुन आलेलं नंतरच्या निवडणुकांमध्ये दिसून आलेलं आहे. कोरोनाच्या धर्तीवर रामदेव बाबांचे पितळ उघडे पडल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की, ' पतंजली च्या औषधाने कोरोणा बरा होत नाही. महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केली तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल. तसेच सर्व जनतेलाही आव्हान केला आहे की या अफवेवर आपण कोणता ही विश्वास ठेवू नये. महाराष्ट्र राज्यात पतंजलीच्या बोगस औषधाला परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे रामदेव बाबांनी कोरोना च्या आजारावर शोधून काढलेल्या औषधाचा केलेला कांगावा पूर्णतः खोटा असल्याचे पुढे येत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise