प्लाझ्मा दान हे कोरोना रूग्णासाठी जीवनदान ; प्रांताधिकारी संतोष भोर : प्लाझ्मा दान करण्याचे केले आवाहन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 27, 2020

प्लाझ्मा दान हे कोरोना रूग्णासाठी जीवनदान ; प्रांताधिकारी संतोष भोर : प्लाझ्मा दान करण्याचे केले आवाहन


प्लाझ्मा दान हे कोरोना रूग्णासाठी जीवनदान 
प्रांताधिकारी संतोष भोर : प्लाझ्मा दान करण्याचे केले आवाहन 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी :  कोरोना संसर्गावर मात करुन जे संसर्गमुक्त झाले आहेत, अशा दात्यांनी पुढे येवून प्लाझ्मा दान करावा असे आवाहन प्रांताधिकारी संतोष भोर यांनी केले. आटपाडी येथील तहसील कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे उपस्थित होते. 
पुढे बोलताना ते म्हणाले, प्लाझ्मा कोरोना अत्यवस्थ रुग्णांसाठी जीवनदान ठरणार आहे.  त्यासाठी संसर्गमुक्त झालेल्यांनी अधिकाधिक पुढे येवून प्लाझ्मा दान करावा. कोरोनाच्या ज्या रुग्णांना ऑक्सिाजन आणि अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करावे लागते, अशांना प्लाझ्मा थेरपी वरदान ठरली आहे, असे प्रयोगातून सिद्ध झाले. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून 28 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणताही रुग्ण प्लाझ्मा दान करू शकतो. एका वेळेस एक रुग्ण 400 मिलि प्लाझ्मा दान करू शकतो. 15 दिवसांच्या अंतराने 2-3 वेळेसही प्लाझ्मा दान करू शकतो. प्लाझ्मा दान केल्याने रुग्णाला कोणताही त्रास होत नाही. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतर चार महिन्यांपर्यंत प्लाझ्मा दान करता येते.  असे प्रांताधिकारी संतोष भोर म्हणाले, तसेच आटपाडी तालुक्यातून कोरोनामुक्त झालेल्या तिघांनी प्लाझा दान केला असल्याचे त्यांनी सांगितले.
 तसेच त्यांनी आटपाडी येथील कोव्हीड सेंटरची माहिती देवून तालुक्यात अजून दोन ते तीन ठिकाणी कोव्हीड सेंटर प्रस्तावित असल्याचे यावेळी त्यांनी सांगतिले.

  

No comments:

Post a Comment

Advertise