Type Here to Get Search Results !

पिंपरी बु. येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात


पिंपरी बु. येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : आटपाडी तालुक्यातील पिंपरी बु. येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पिंपरी बु. येथील - 1) पिंपरी बु. गावाचे उत्तर - पिंपरी बु. ओढ्यावरील पुल 2) पिंपरी बु. गावाचे दक्षिण -नौशाद मौलासो मुलाणी यांचे घर 3) पिंपरी बु. गावाचे पूर्व - मंगेश वसंत पवार यांचे घर 4) पिंपरी बु. गावाचे पश्चिम - सुमन दाजीराम कदम यांची शेतजमिन. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन - 1) पिंपरी बु. गावाचे उत्तर - पिंपरी बु. विभूतवाडी रोडवरील काळीखडी टेकडी 2) पिंपरी बु. गावाचे दक्षिण -पोपट बाबू जाधव यांचे घर 3) पिंपरी बु. गावाचे पूर्व - घरनिकी पिंपरी बु. कॅनॉल 4) पिंपरी बु. गावाचे पश्चिम - हणमंत रामभाऊ तरसे यांची शेतजमीन.
सदर भागांमध्ये सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies