लॉकडाऊनच्या अनुषंगाने जारी केलेल्या आदेशांची अंमलबजावणी 31 जुलै पर्यंत करण्याचे आदेश जारी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

लॉकडाऊनच्या अनुषंगाने जारी केलेल्या आदेशांची अंमलबजावणी 31 जुलै पर्यंत करण्याचे आदेश जारी


लॉकडाऊनच्या अनुषंगाने जारी केलेल्या आदेशांची अंमलबजावणी  31 जुलै पर्यंत करण्याचे आदेश जारी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाने 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 31 मे 2020 च्या आदेशान्वये 30 जून 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. तथापी लॉकडाऊनचा कालावधी 31 जुलै पर्यंत वाढविण्यात आल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिनांक 31 मे 2020 रोजी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी दि. 31 जुलै 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत करण्याचे आदेश जारी केले आहेत.
तसेच दिनांक 31 मे रोजी जारी केलेल्या आदेशामधील अंत्यविधी व लग्नसमारंभामध्ये व्यक्तींच्या एकत्र येण्याच्या मुद्यामध्ये अंशत: बदल करण्यात आला असून आता लॉकडाऊन कालावधीत अंत्यविधीकरिता 50 व लग्नसमारंभ करिता 50 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शासन निर्देशाप्रमाणे सदर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहील. केशकर्तनालय, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स बाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 26 जून 2020 रोजी पारित करण्यात आलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसिमा हद्दीत यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, इंसिडन्ट कमांडर तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाव्दारे प्राधिकृत करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise