या दिवशी पंतप्रधान मोदी करणार अयोध्येत राममंदिराचं भूमिपूजन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 19, 2020

या दिवशी पंतप्रधान मोदी करणार अयोध्येत राममंदिराचं भूमिपूजनया दिवशी पंतप्रधान मोदी करणार अयोध्येत राममंदिराचं भूमिपूजन
अयोध्या: अयोध्यामध्ये राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झाली असून 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचं भूमिपूजन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या भूमिपूजन सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहणार आहेत.
मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख आता निश्चित करण्यात आलीआहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. त्यांनी देशातील वाराणसी, केदारनाथसारख्या इतर मंदिरांना त्यांनी अनेकदा भेट दिली. पण अयोध्येचा विषय कोर्टाकडे असल्याने त्यांनी या ठिकाणची भेट टाळली होती. कोरोनाच्या काळात फार गर्दी होऊ नये यासाठीही खबरदारी घेण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise