राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा आज शपथविधी ; राज्यातून कोण-कोण शपथ घेणार पहा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 22, 2020

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा आज शपथविधी ; राज्यातून कोण-कोण शपथ घेणार पहा


राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा आज शपथविधी ; राज्यातून कोण-कोण शपथ घेणार पहा
नवी दिल्ली :  राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा आज शपथविधी होणार आहे. यामध्ये राज्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरपीआयचे अध्यक्ष डॉ. रामदास आठवले, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, राष्ट्रवादीचे शरद पवार, भाजपाचे उदयनराजे भोसले हे शपथ घेणार आहे.
देशातील २० राज्यामधून निवडून आलेले एकूण ६२ खासदार शपथ घेणार आहे. तसेच जे खासदार आज शपथविधीला उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांना अधिवेशनावेळी सभागृहात शपथ दिली जावू शकते.
नवीन निवडून आलेल्या खासदारामध्ये भाजपाचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे, माजी पंतप्रधान आणि जनता दल-सेक्युलरचे प्रमुख एचडी देवगौडा, आदि दिग्गज नेते देशाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये दिसणार आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise