आटपाडी तालुक्यातील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट! कानकात्रेवाडी ; एका पॉझिटिव्हमुळे आतापर्यंत १० जणांना जडला संसर्ग - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 6, 2020

आटपाडी तालुक्यातील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट! कानकात्रेवाडी ; एका पॉझिटिव्हमुळे आतापर्यंत १० जणांना जडला संसर्ग


आटपाडी तालुक्यातील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट! कानकात्रेवाडी
एका पॉझिटिव्हमुळे आतापर्यंत १० जणांना जडला संसर्ग
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या प्रवेशापासून ते आजपर्यंत पहिल्यांदाच रविवारी इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यात कानकात्रेवाडी या एकट्या गावात ८ पॉझिटिव्ह आढळल्याने आटपाडी तालुक्यातील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट समोर आला असून  आटपाडी तालुक्यात रुग्णांचा आकडा ५२ वर पोहोचला आहे. 
काल आलेल्या पॉझिटिव्ह मध्ये कानकात्रेवाडी येथील ४ महिला व ४ पुरुष, पिंपरी बु व नेलकरंजी येथील प्रत्येकी एक पुरुष असे १० रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत.  
काल सापडलेले १० नवीन कोरोनाबाधित रूग्णामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून चिंतेचे वातावरण असून हे रुग्ण कोणा कोणाच्या संपर्कात आले आहेत काय, याची पडताळणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. समूह संसर्गाला थांबवायचे असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. मास्क वापरा, हात वेळोवेळी धुवा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise