राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ. फौजिया खान यांना कोरोनाची लागण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 21, 2020

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ. फौजिया खान यांना कोरोनाची लागण


राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ. फौजिया खान यांना कोरोनाची लागण
परभणी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मी कुठेही गेले नाही, सर्व काळजी घेतली. तरीही कसा संसर्ग झाला? हे माहिती नाही. माझी प्रकृती उत्तम असल्याने मी घरीच क्वॉरंटाईन होऊन उपचार घेणार असल्याच्या त्या म्हणाल्या. 
खासदार फौजिया खान या त्यांच्या परभणीतील नांदखेडा रोड भागातील घरीच आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्या अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य कुठेही बाहेर निघाले नाहीत. मात्र त्यांना दोन दिवसांपासून काही लक्षणं दिसत असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या घरासह स्थानिक परिसर प्रशासनाने सॅनिटाईज करून सील केला आहे. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्य आणि इतर लोकांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. जिल्ह्यातील नेत्यांनाही आता कोरोनाची लागण झाल्याने प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise