पात्रेवाडी येथे आई व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 24, 2020

पात्रेवाडी येथे आई व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह


पात्रेवाडी येथे आई व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील पात्रेवाडी येथील २६ वर्षीय महिलेसह तिचा अडीच वर्षाच्या मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पात्रेवाडी परीसरासह तालुक्यामध्ये खळबळ माजली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, पात्रेवाडी येथील महिलेचा जरंडी येथे विवाह झालेला आहे. सदर महिला ही आपल्या अडीच वर्षाच्या मुलासह माहेरी आली होती. या महिलेला  जरंडी येथील सासू-सासरा हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याबाबत तात्काळ आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कातील यादी तयार केली असता त्यांच्या संपर्कामध्ये सून व नातू आल्याचे समजताच आटपाडी येथील आरोग्य विभागाशी संपर्क साधला. सदर महिलेला व लहान मुलाचा स्बव तपासणीसाठी पाठविला होता. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यामध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise