"मिशन झिरो" भारतीय जैन संघटनेचा स्तुत्य उपक्रम : पालकमंत्री जयंत पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 21, 2020

"मिशन झिरो" भारतीय जैन संघटनेचा स्तुत्य उपक्रम : पालकमंत्री जयंत पाटील


"मिशन झिरो" भारतीय जैन संघटनेचा स्तुत्य उपक्रम :  पालकमंत्री जयंत पाटील
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली महानगरपालिका व ए.बी. पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय जैन संघटनामिशन झिरो हा प्रकल्प राबवणार आहे. भारतीय जैन संघटनेचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच शासन या योजनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असेआश्वासन दिले.
मिशन झिरो प्रकल्पाचा शुभारंभ कल्पद्रुम ग्राउंड नेमिनाथनगर येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते दि. 20 जुलै रोजी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संजय बजाज, मार्केट कमिटीचे चेअरमन दिनकर पाटील, बाळासाहेब पाटील, सुरेश पाटील, राहुल पवार, राजगोंडा पाटील, सुभाष देसाई, वसंत पाटील, वसीम मुल्ला आदि मान्यवर उपस्थित होते.
काही दिवसांमध्ये संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये मिशन झिरो ही योजना राबवणार असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात येत्या 8 दिवसामध्ये सांगली मध्ये झालेला कोरोनाचा फैलाव निश्चितच थांबेल. नागरिकांनी या योजनेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याबाबत अधिक माहिती देताना सुरेश पाटील म्हणाले, मिशन झिरो प्रकल्पांतर्गत येत्या 23 जुलैपासून संपूर्ण महापालिका क्षेत्रातील कंटेनमेंट झोनमध्ये ही सेवा पुरवेल. त्यामध्ये अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन प्रत्येक भागातील घर ते घर तपासणी करतील. त्या ठिकाणी ताप व ऑक्सिजन लेव्हलचे स्क्रीनिंग करून जर एखाद्या पेशंटला जर ताप किंवा कोरोना संशयित असेल त्यांना तज्ज्ञांमार्फत तपासून अँटीजेंट टेस्ट केली जाईल. या अँटीजेंट टेस्टमुळे अवघ्या अर्ध्या तासात पेशंट कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ते कळते. यामुळे कंटेनमेंट झोनमधील केसेस कमी येण्यास मदत होईल. त्यामध्ये जर एखादा पेशंट कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर त्याला दवाखान्यात ॲडमिट करण्यात येईल. हा उपक्रम संपूर्ण महापालिका क्षेत्रात सर्व स्वयंसेवी संस्था,दानशूर व्यक्ती यांची मदत घेवून मोठ्या प्रमाणावर करणार असल्याचे सांगितले. अशा पद्धतीने जेथे जेथे कंटेनमेंट झोन आहेत त्या ठिकाणी येत्या 23 जुलैपासून मिशन झिरो'चे काम हे सुरू होणार आहे. त्यामुळे संपूर्ण सांगलीशहरांमध्ये जे कोरोना पेशंट मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत त्याठिकाणी प्रतिबंध होईल.
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा यांच्यानेतृत्वाखाली मुंबईमध्ये धारावी येथे दिनांक 22 जून पासून 'मिशन झिरो'हा प्रकल्प चालू आहे. त्यामुळे धारावी झोपडपट्टी मधील वाढणाऱ्या रुग्णांचे प्रमाण निश्चित कमीझालेले आहे व याची दखल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने ही घेतलेली आहे. सदरचा प्रकल्प हा मुंबई व महाराष्ट्र पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. याचेच अनुकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहे. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise