सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा सांगली जिल्हा दौऱ्यावर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 2, 2020

सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा सांगली जिल्हा दौऱ्यावरसहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा सांगली जिल्हा दौऱ्यावर
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या गुरूवार, दिनांक 2 जुलै 2020 रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3 वाजता स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकास भेट, स्थळ - डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी. दुपारी 3.30 वा. देवराष्ट्रे येथे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मारकास भेट. दुपारी 3.45 वाजता देवराष्ट्रे येथून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सायंकाळी 4.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या सांगली जिल्हा आढावा बैठकीस उपस्थिती (विषय - कोव्हीड-19, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मान्सूनपूर्व करावयाचे नियोजन). सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषद, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. सायंकाळी 7.45 वाजता सांगली येथे मुक्काम.

No comments:

Post a Comment

Advertise