सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील सांगली जिल्हा दौऱ्यावर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 31, 2020

सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील सांगली जिल्हा दौऱ्यावर
सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील सांगली जिल्हा दौऱ्यावर


सांगली : राज्याचे सहकार, पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे शनिवार दिनांक 01 ऑगस्ट 2020 रोजी सांगली जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.


शनिवार दिनांक 01 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 7.30 वा कराड येथून खाजगी वाहनाने साखराळे ता. वाळवा येथे आगमन व स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या 101 व्या जयंती कार्यक्रमास उपस्थिती स्थळ - राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, राजारामनगर साखराळे, सकाळी 9.15 वा वाटेगाव ता. वाळवाकडे प्रयाण. 


सकाळी 9.40 वा. वाटेगाव येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती कार्यक्रमास उपस्थिती.


सोईनुसार वाटेगाव येथून इस्लामपूर सर्किट हाऊसकडे प्रयाण. सकाळी 11 वा श्री मानसिंगराव नाईक, विधानसभा सदस्य यांचेसमवेत बैठकीस उपस्थिती स्थळ - सर्किट हाऊस इस्लामपूर. सोईनूसार इस्लामपूर येथून कराडकडे प्रयाण
No comments:

Post a Comment

Advertise