मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सांगली जिल्हा दौरा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सांगली जिल्हा दौरा


मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सांगली जिल्हा दौरा
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार गुरूवार, दिनांक 2 जुलै 2020 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या सुधारीत दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता पुणे येथून शासकीय मोटारीने डॉ. पतंगराव कदम सहकारी साखर कारखाना वांगी, ता. कडेगावकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकास भेट, स्थळ - डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी. दुपारी 3.30 वा. देवराष्ट्रे येथे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मारकास भेट. दुपारी 3.45 वाजता पलूस येथे आगमन व पलूस / कडेगाव येथील पुनर्वसन कामांचा आढावा, स्थळ - पंचायत समिती पलूस. सायंकाळी 4.45 वाजता पलूस येथून सांगलीकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सांगली जिल्हा आढावा बैठक (विषय - कोव्हीड-19, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मान्सूनपुर्व करावयाचे नियोजन). सायंकाळी 7 वाजता पत्रकार परिषद, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. सायंकाळी 7.30 वाजता सांगली येथून शासकीय मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment

Advertise