"महाजॉब्स योजना शिवसेना-राष्ट्रवादीची की, महाविकास आघाडीची?" काँग्रेसच्या युवा नेत्याची नाराजी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 16, 2020

"महाजॉब्स योजना शिवसेना-राष्ट्रवादीची की, महाविकास आघाडीची?" काँग्रेसच्या युवा नेत्याची नाराजी

satyjit tambe

"महाजॉब्स योजना शिवसेना-राष्ट्रवादीची की, महाविकास आघाडीची?"  काँग्रेसच्या युवा नेत्याची नाराजी 
माणदेश एक्सप्रेस टीम
मुंबई  : राज्यामध्ये मोठा गाजावाजा करीत लॉकडाऊनच्या कालावधीत सुरु करण्यात आलेले ‘महाजॉब्स’ पोर्टल वरून सरकारमध्ये सामील असलेल्या काँग्रेसच्या युवा जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्विट केले आहे. महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या ट्विटसोबत तांबे यांनी एक फोटो जोडलेला आहे, यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा फोटो आहे, त्यात कुठेही काँग्रेस मंत्र्यांचा फोटो लावण्यात आला नाही, त्यामुळे काँग्रेसचे नेत्यांना राज्य सरकारमध्ये डावलण्यात येत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Advertise