कोळा अर्बन बँकेचे मॅनेजर आनंदा सरगर यांचे दुःखद निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 21, 2020

कोळा अर्बन बँकेचे मॅनेजर आनंदा सरगर यांचे दुःखद निधन


कोळा अर्बन बँकेचे मॅनेजर आनंदा सरगर यांचे दुःखद निधन
माणदेश एक्सप्रेस न्युज
कोळा/वार्ताहर : सांगोला तालुक्यातील कोळा येथील कृषी सेवा अर्बन बँकेचे मॅनेजर आनंदा बापू सरगर यांचे आज डी. २१ रोजी दु:खद निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ४६ वर्षे होते.
आनंदा सरगर हे कृषिसेवा अर्बन को-ऑप बँकेचे  स्थापनेपासुन जनरल मॅनेजर, अहिल्या बालक मंदिर स्कूल कोळेचे संस्थापक अध्यक्ष व धनलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्था मर्यादित कोळे या संस्थेचे संचालक तसेच अहिल्या अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड जुनोनी या  संस्थेचे चेअरमन असा हा विविध पदभार सांभाळत होते. त्यांच्या निधनाने कोळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ, आई वडील असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise