अयोध्येत भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 21, 2020

अयोध्येत भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण


अयोध्येत भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण
मुंबई : अयोध्येत राम मंदिर उभारण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राम मंदिर बांधण्यासाठी 5 ऑगस्टला भूमिपूजन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित मंदिर बांधकाम पायाभरणी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. 
या सोहळ्याला मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत यांच्यासह 300 जणांना निमंत्रण पाठविण्याची तयारी सुरु झाली आहे. या व्यतिरिक्त अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही या खास कार्यक्रमात भाग घेतील. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचादेखील या यादीत समावेश आहे.
अयोध्यामधील पुजाऱ्यांनी तीन दिवसीय वैदिक अनुष्ठानांसह तीन ऑगस्टला रामजन्मभूमी साइटवर सोहळ्यासाठी मोठा आराखडा तयार केला आहे. दि. 4 ऑगस्टला रामाचार्य पूजा होईल. यानंतर 5 ऑगस्ट रोजी रात्री 12:15 वाजण्याच्या भूमिपूजन आयोजित केले जाईल. मोदी यांची अयोध्या आणि राम मंदिर परिसराची ही पहिली भेट असेल. 5 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापण्याची घोषणा केली होती.

No comments:

Post a Comment

Advertise