मापटेमळा येथे कोरोनाचा शिरकाव - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 25, 2020

मापटेमळा येथे कोरोनाचा शिरकाव


मापटेमळा येथे कोरोनाचा शिरकाव 
माणदेश एक्स्प्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील मापटेमळा येथील पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने कोरोनाने मापटेमळा येथे शिरकाव केला आहे.मापटेमळा हे गाव आटपाडी शहराच्या जवळच असून शहरातील ग्रामीण रुग्णालय, शासकीय विश्रांतीगृह हि शासकीय कार्यालये व गुरुकुल विद्यालय हे मापटेमळा ग्रामपंचायतच्या परीसरामध्ये येते. या ठिकाणी मुंबई येथून अंदाजे ५० वर्षीय पुरुष आला होता. सदर पुरुषाने संस्था क्वारंनटाईन होणे गरजेचे असताना तो होम क्वारंनटाईन झाला होता. सदर व्यक्तीला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्याचा स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याठिकाणी प्रशासनाने भेट देत आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise