Type Here to Get Search Results !

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर



कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 97 हजार 413 वर पोहोचली आहे. काल रविवारी एकाच दिवसात देशात तब्बल 24,248 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, देशातील रुग्णसंख्येचा आकडा 7 लाखांच्या घरात पोहोचला असून कोरोनामुळे सर्वाधिक बाधित रुग्णांच्या यादीत यादीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आला असल्याने भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवाडीनुसार गेल्या 24 तासात देशभरात 24,248 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, 424 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 19,693 पर्यंत पोहोचली आहे. देशात गेल्या 4 दिवसात सातत्याने 20 हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळून आल्याने कोरोना आणखीनच चिंताग्रस्त बनत चालला आहे. मात्र, दिलासादायक वृत्त म्हणजे आत्तापर्यंत 4 लाख 24 हजार 433 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 
कोविड 19 च्या सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून ब्राझील व रशियानंतर भारत चौथ्या स्थानावर होता. मात्र, गेल्या आठवड्यातील रुग्णवाढीचा वेग वाढल्याने रशियापेक्षा अधिक कोरोनाबाधितांची संख्या भारतात झाली आहे. दरम्यान, वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन काही राज्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक आणि आसाम या राज्यांनी काही जिल्ह्यांत लॉकडाऊन घोषित केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies