सोन्याच्या दरात वाढ ; केला 50 हजाराचा टप्पा पार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 2, 2020

सोन्याच्या दरात वाढ ; केला 50 हजाराचा टप्पा पारसोन्याच्या दरात वाढ ; केला 50 हजाराचा टप्पा  पार
मुंबई :  लग्न सराईच्या हंगामात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. मुंबईत प्रतितोळा सोन्यासाठी नागरिकांना तब्बल 50 हजार 282 रुपये दर असून नुसता जीएसटी जवळपास 1500 रुपयांच्या आसपास भरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना 10 ग्राम सोन्यासाठी जीएसटी पकडून 51 हजार 782 रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. या दरांत आणखी वाढ होऊनहोण्याची शक्यता देखील मुंबई ज्वेलर्स असोसिएशनकडून वर्तवण्यात येतं आहे.
सोमवारी जीएसटी सोडून सोन्याचा 10 ग्रामसाठी दर 48 हजार 886 रुपये इतका होता. यामध्ये आज जवळपास 1400 रुपयांची वाढ होऊन तो 50 हजार 282 रुपये इतका झालेला आहे. आज सोन्याच्या दरात 10 ग्रामसाठी 1400 रुपयांची वाढ झाली आहे. यासोबतच जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी चांदी देखील 50 हजारांच्या पूढे गेली आहे. 
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणामुळे जगभरात मंदीचे सावट आहे. अशात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीने आठ वर्षांच्या विक्रमी पातळीच्या आसपास जाण्याची किमया केली आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise