सोलापूरमध्ये दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 6, 2020

सोलापूरमध्ये दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करता येणारसोलापूरमध्ये दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/प्रतिनिधी : सोलापूर शहरांमध्ये वाढत्या कोरोना संख्येमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे  त्याला आळा घालण्यासाठी दुचाकीवरुन फिरणाऱ्या नागरिकांना फक्त एकाच व्यक्तीला परवानगी देण्यात आली आहे. तर रिक्षामधून दोघांना व चार चाकी मधून तिघांना प्रवास करता येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. तर विना मस्त फिरणाऱ्या  व सोशल डिस्टस्निंगचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 
परंतु या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. तर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करीत आहे, त्यामुळे सोलापूर आता फक्त दुचाकीवरून एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise