अजनाळेत तीन ट्रान्सफार्म मंजूर दोन चे काम पूर्ण एकाचे प्रगतीपथावर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

अजनाळेत तीन ट्रान्सफार्म मंजूर दोन चे काम पूर्ण एकाचे प्रगतीपथावर


अजनाळेत तीन ट्रान्सफार्म मंजूर दोन चे काम पूर्ण  एकाचे प्रगतीपथावर 
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : अजनाळे ता. सांगोला येथील गावठाण हद्दीमध्ये महावितरणचा सतत खोळंबा होत असल्यामुळे वेळोवेळी महावितरणकडे नवीन ट्रान्सफार्म बसवण्याची मागणी गावातील ग्रामस्थांमधून केली जात होती. विजेचा जास्त लोड असल्यामुळे सतत खोळंबा होत असल्यामुळे गावठाण हद्दीतील राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे गावठाण हद्दीमध्ये नवीन ट्रान्सफार्म बसवण्याची मागणी महावितरण कडे गेल्या  दोन वर्षापासून  मागणी केली जात होती. याच मागणीची दखल घेऊन सहाय्यक अभियंता सचिन आटपाडकर यांनी डि.पी.डि.सी योजनेतून अजनाळे गावाला तीन ट्रान्सफार्म मंजूर करून आत्तापर्यंत दोन ट्रान्सफार्मचे काम पूर्ण झाले असून एका ट्रान्सफार्म चे काम प्रगतीपथावर चालू असल्याची माहिती सहाय्यक अभियंता सचिन आटपाडकर यांनी दिली. 
आटपाडकर यांच्या  पुढाकाराने अजनाळे गावाला तीन ट्रान्सफार्म नवीन मिळाल्याने गावठाण हद्दीतील  विजेचा कायमचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे महावितरणचे गावातील ग्रामस्थांमधून अभिनंदन केले जात आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise