कोरोनाला संपवायचंय तर हनुमान चालिसाचे पठण करा : भाजपच्या या वादग्रस्त खासदारांचा अजब दावा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 26, 2020

कोरोनाला संपवायचंय तर हनुमान चालिसाचे पठण करा : भाजपच्या या वादग्रस्त खासदारांचा अजब दावा

साध्वी प्रज्ञा

कोरोनाला संपवायचंय तर हनुमान चालिसाचे पठण करा : भाजपच्या या वादग्रस्त खासदारांचा अजब दावा भोपाळ : कोरोनाला संपवायचंय तर हनुमान चालिसाचे पठण करा असा सल्ला भाजपच्या वादग्रस्त खासदारांनी दिला आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या वेळी त्यांनी कोरोनाला नष्ट करण्याचा उपाय सुचवला आहे.
कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी त्यांनी हनुमान चालीसाचे वाचन करा असा अजब दावा केला आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, '25 जुलै ते 5 ऑगस्ट दररोज सायंकाळी 7 वाजता हनुमान चालीसाचे वाचन पाच वेळा केल्याने देशातील कोरोना नष्ट होईल.' याबाबत त्यांनी ट्वीट करत कोरोना नष्ट करण्याचा उपाय सुचवला आहे.ट्वीटमध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, कोरोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सगळे एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. आजपासून म्हणजे 25 जुलै ते 5 ऑगस्ट दररोज सायंकाळी 7 वाजता घरात हनुमान चालीसाचे पठण करा. 5 ऑगस्टला रामलल्लाची आरती केल्यानंतर घरात दिवा लावून समारोप करूया' त्यामुळे आणखी एक वादग्रस्त विधान करून खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise