पती-पत्नी, बाप-लेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्ण सांगोला तालुक्यातील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 21, 2020

पती-पत्नी, बाप-लेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्ण सांगोला तालुक्यातील


पती-पत्नी, बाप-लेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्ण सांगोला तालुक्यातील 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यांमध्ये दि. २१ रोजी ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या कोरोना बाधिताच्या संपर्कात असलेल्या एकूण 56 व शहरी भागांमध्ये कोरोना बाधिताच्या संपर्कात असलेल्या व लक्षणे दिसत असलेल्या 31 अशा एकूण 87 व्यक्तींच्या रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 05 जणांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पॉझिटिव्ह आणि आणि उर्वरीत 82 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. 
यामध्ये सांगोला नगरपरिषद हद्दीमध्ये असणाऱ्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या मौजे माळेवाडी ता. सांगोला येथील एका रुग्णाची व त्याच्या पत्नीची रॅपिड अॅन्टीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर आणखी एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या मौजे जवळा येथील एका व्यक्तीची व त्याच्या मुलाची रॅपिड अॅन्टीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मौजे निजामपूर ता. सांगोला येथे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये एका पुरुष व्यक्तीची रॅपिड अॅन्टीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. असे एकुण 4 पुरुष व एक महिला असे 05 जणांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे.
वरील कोरोनाबाधित रूग्णांचे प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथे विलगीकरण करण्यात आले असून त्यांचे निकट संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती घेणेचे काम सुरू आहे. तसेच मौजे जवळा गावठाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. मौजे जवळा येथे प्रतिबंधित क्षेत्रात आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येणार असून मौजे पुजारवाडी सांगोला, मौजे घेरडी, मौजे निजामपूर येथे वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. अशी माहिती उप विभागीय अधिकारी श्री. उदयसिंह भोसले यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise