या गावातील हरिनाम सप्ताह रद्द - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 24, 2020

या गावातील हरिनाम सप्ताह रद्दया गावातील हरिनाम सप्ताह रद्द 
माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/वार्ताहर : आटपाडी तालुक्यातील करगणी ता येथील प्राचीन हेमाडपंथी श्री लक्ष्मेश्वर मंदिरामध्ये साजरा होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह रद्द करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समिती व श्री राम मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.यावेळी बोलताना सरपंच गणेश खंदारे यांनी जनता कर्फ्यूचे कडक पालन करणार असल्याचे सांगितले. बैठकीला उपसरपंच जब्बार पटेल, दत्तात्रय पाटील, तुकाराम जानकर, ग्रामविकास अधिकारी उत्तमराव पाटील, श्रीराम ट्रस्टचे अध्यक्ष शरद पाटील, विठ्ठल ढोबळे, बाळू पिसे, राजाराम सरगर, नवनाथ महाराज करगणीकर, सुधाकर सरगर आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Advertise