आटपाडीत वाळू तस्करांचा हैदोस डवरी समाजाच्या स्मशानभूमीतील वाळू चोरीमुळे मृत्यूदेहाची हाडे पडली उघडी ; आमदार गोपीचंद पडळकरांनी वाळू तस्करावर गुन्हे दाखल करण्याचे दिले महसूल आदेश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 10, 2020

आटपाडीत वाळू तस्करांचा हैदोस डवरी समाजाच्या स्मशानभूमीतील वाळू चोरीमुळे मृत्यूदेहाची हाडे पडली उघडी ; आमदार गोपीचंद पडळकरांनी वाळू तस्करावर गुन्हे दाखल करण्याचे दिले महसूल आदेश

mandesh  express

आटपाडीत वाळू तस्करांचा हैदोस 
डवरी समाजाच्या स्मशानभूमीतील वाळू चोरीमुळे मृत्यूदेहाची हाडे पडली उघडी ; आमदार गोपीचंद पडळकरांनी वाळू तस्करावर गुन्हे दाखल करण्याचे दिले महसूल आदेश   
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शुक्र ओढ्यातील डवरी समाजाच्या स्मशानभूमीतील अंदाजे पंचवीस ब्रास वाळू तस्करांनी चोरून नेली वाळू चोरून नेताना स्मशानभूमीत पुरलेली मृत्यू देहाची हाडे उघडी पडली आहेत. त्यामुळे डवरी समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून वाळू तस्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी डवरी समाजातील कार्यकर्त्यांनी तहसीलदार सचिन लंगुटे यांच्याकडे केली आहे. तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाळू तस्करांचा बंदोबस्त करण्यात येवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले आहेत. त्यानंतर आटपाडीचे तलाठी सुधाकर केंगार यांनी वाळू चोरीचा पंचनामा करून पंचवीस ब्रास वाळू किंमत अंदाजे सव्वा लाख रुपये चोरीस गेल्याची तक्रार आटपाडी पोलिस ठाण्यात दिली. संशयित सतरा वाळू तस्करा विरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात आल्याने स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे मृत्यूदेहाची हाडे उघड्यावर पडल्याने डवरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे समाजातील कार्यकर्त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे वाळू तस्करांचा बंदोबस्त करावा त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी समाजातील कार्यकर्त्यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise