उद्या दुध बंद एल्गार आंदोलन : आमदार गोपीचंद पडळकर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 31, 2020

उद्या दुध बंद एल्गार आंदोलन : आमदार गोपीचंद पडळकर
उद्या दुध बंद एल्गार आंदोलन : आमदार गोपीचंद पडळकर 


माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी 1 ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्ह्यासह आटपाडी तालुक्यात गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे आंदोलन तीव्र करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले.

गायीच्या दुधाला १० रुपये प्रति लिटर अनुदान द्यावे. दुध भुकटी निर्यातीला प्रती किलो ५० रुपये अनुदान द्यावे. 

देवेंद्र फडणवीस सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांना ६७३ कोटी रुपये मंदीच्या काळात दिले होते. तर शेतकऱ्याला प्रति लिटर ५ रुपये अनुदान व भुकटीच्या निर्यातीला ५० रुपये अनुदान दिले होते. सत्ताधरी राष्ट्रवादी काँग्रेस व काही संघटना केंद्र सरकाने भुकटी आयात केल्यामुळे दुधाचे भाव पडले आहेत असा खोटा कांगावा करत आहेत. केंद्र सरकारने परदेशातून भुकटी आयात केलेली नाही. 

कोविडचे संकट पाहता कोणत्याही व्यापाऱ्याला भुकटी आयात करायचा परवाना दिलेल्या नाही. इत्यादी मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात येणार असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले.
सदरचे आंदोलन हे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात येणार आहे.  


No comments:

Post a Comment

Advertise