मातोश्रीच्या बाहेर पडून सरकार चालवून दाखवा : भाजपच्या आमदारांचे ठाकरे सरकारला आव्हान - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 26, 2020

मातोश्रीच्या बाहेर पडून सरकार चालवून दाखवा : भाजपच्या आमदारांचे ठाकरे सरकारला आव्हान


मातोश्रीच्या बाहेर पडून सरकार चालवून दाखवा : भाजपच्या आमदारांचे ठाकरे सरकारला आव्हान
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : मातोश्रीच्या बाहेर पडून आणि मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसून आधी सरकार तर चालवून दाखवा असे थेट आव्हान भाजपच्या आमदारांनी दिले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधक नेहमी ते मंत्रालयात जात नाहीत, असे आरोप करतात. यावर मुख्यमंत्री ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. शिवसेनेचे खासदार संपादक संजय राऊत यांनी घेलेल्या विशेष मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी एकच वेळेला पोहचू शकतो तर ते का वापरु नये?, असा प्रश्नच उद्धव ठाकरे यांनी टीकाकारांना केला आहे. ’कोरोना काळात तुम्ही मंत्रालयामध्ये कमीत कमी वेळा गेलात, असा आपल्यावर सतत आरोप होतो याबद्दल काय सांगाल?, असा प्रश्न विचारला होता.परंतु या वादामध्ये भाजपचे युवा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उडी घेतली असून त्यांनी मातोश्रीच्या बाहेर पडून आणि मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसून आधी सरकार तर चालवून दाखवा असे थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे आमदार पडळकर  पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise