राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनाने निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 16, 2020

राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनाने निधन

nila satynarayn

राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनाने निधन
मुंबई : राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं आज (16 जुलै) निधन झालं. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होता. परंतु कोरोनाने त्यांचा मृत्यू झाला. त्या 71 वर्षांच्या होत्या.
त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1949 रोजी झाला होता. त्या 1972 च्या आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी 37 वर्षांच्या कारकिर्दीत गृह, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केलं त्या कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी होत्या त्याचबरोबर त्या लेखिकाही होत्या. संवेदनशील कवयित्री, स्तंभलेखिका म्हणून त्या लोकप्रिय झाल्या. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तकं लिहिली. याशिवाय 150 हून अधिक कविता लिहिल्या. त्याचबरोबर त्यांना संगिताचा आवड असल्याने त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं.

No comments:

Post a Comment

Advertise