आधी कोरोना चाचणी, मगच दुकान उघडण्यास परवानगी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 26, 2020

आधी कोरोना चाचणी, मगच दुकान उघडण्यास परवानगी


आधी कोरोना चाचणी, मगच दुकान उघडण्यास परवानगी
सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना बार्शी शहरातील सर्व दुकाने, आस्थापना यांच्या मालकांनी कोरोनाची चाचणी करून त्याचा अहवाल दुकानाच्या दर्शनी भागात लावावे असा महत्त्वपूर्ण निर्णय बार्शीच्या तहसीलदार यांनी घेतला आहे. 
बार्शी शहरांमध्ये दिनांक 16 जुलै ते 26 जुलै पर्यंत असा दहा दिवसाचा कडक लॉकडाऊन चालू आहे. प्रांताधिकारी हेमंत निकम, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप सोपल, तहसीलदार कुंभार, बार्शी पोलीस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे व बार्शीतील सर्व व्यापारी संघटनांचे अध्यक्ष यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत बार्शी शहरातील लॉकडाऊन अजून पाच दिवस म्हणजेच 31 जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी उत्सुक असतात मात्र आता व्यापाऱ्यांना त्यांची कोरणा चाचणी करून जर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तरच दुकान उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. असा निर्णय बार्शीचे तहसीलदार कुंभार यांनी घेतला आहे व तशा आशयाचे पत्र कामगार आयुक्त सोलापूर यांनीही बार्शीतील सर्व दुकानदारांना दिले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise