अखेर नाथनगरी खरसुंडीत कोरोनाचा शिरकाव ; सदरचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ३५ जणांच्या संपर्कात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 28, 2020

अखेर नाथनगरी खरसुंडीत कोरोनाचा शिरकाव ; सदरचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ३५ जणांच्या संपर्कात


अखेर नाथनगरी खरसुंडीत कोरोनाचा शिरकाव ; सदरचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ३५ जणांच्या संपर्कात
माणदेश एक्सप्रेस न्युज 

खरसुंडी/वार्ताहर : नाथनगरी खरसुंडी (ता.आटपाडी) येथील एका गलाई व्यवसायिकास कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्तीने आजारी असताना खरसुंडी येथीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते.

मात्र कोरोणाची लक्षणे जाणवल्याने सदर व्यक्तीने स्वतः काल सांगलीत जावून कोरोना चाचणी केली असता आज कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

खरसुंडी गावामध्ये लॉकडाउनच्या काळात ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून कोरोणाचा शिरकाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ही विशेष दक्षता घेण्यात आली होती. मात्र सदरची कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती कामानिमित्त सांगली, तासगाव येथे गेली होती. प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. 

रुग्णाच्या संपर्कातील ३५ जणांची कोरोणा चाचणी घेण्यात येणार असल्याची  माहिती खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश जाधव यांनी दिली.


No comments:

Post a Comment

Advertise