निवडणुकीच्या काळात भाजप पदाधिकाऱ्याला निवडणूक आयोगाचं काम : पृथ्वीराज चव्हाण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 24, 2020

निवडणुकीच्या काळात भाजप पदाधिकाऱ्याला निवडणूक आयोगाचं काम : पृथ्वीराज चव्हाण


निवडणुकीच्या काळात भाजप पदाधिकाऱ्याला निवडणूक आयोगाचं काम : पृथ्वीराज चव्हाणमुंबई : निवडणुकीच्या काळात भाजप पदाधिकाऱ्याला निवडणूक आयोगाचं काम दिले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. 


मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की,सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात प्रचार करायला जी कंपनी होती. त्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला मी पत्र लिहिले आहे. ही कंपनी एक भाजप पदाधिकाऱ्याची  आहे. तो भाजप युवा आयटी सेलचा प्रमुख आहे. त्याने निवडणूक आयागाचे सोशल मीडिया पेज चालवले, तोच पत्ता निवडणूक आयोग जाहिरात करताना वापरला, असल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे.त्यांनी आरोप केली की, निवडणूक आयोगानं जाहिरात करताना जो पत्ता द्यावा लागतो, तो खासगी कंपनीचा दिला. याच कंपनीची सोशल सेंट्रल नावाची कंपनी आहे. या दोन्ही कंपन्या देवांग दवेच्या आहेत. देवांग दवे हा आयटी बोर्ड महाराष्ट्र सदस्य असं म्हटल आहे, असं बोर्ड अधिकृत राज्य सरकारचं नाही. दवे हा भाजप युवा मोर्चा पदाधिकारी आहे. जो भाजपचा पदाधिकारी आहे. त्याच्या कंपनीला काँट्रॅक्ट कसं दिलं? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.


No comments:

Post a Comment

Advertise