सुशिक्षित बेरोजगारांनी कौशल्य विकास विभागाच्या वेबसाईटवर नाव नोंदणी अद्ययावत करावी : ए. बी. तांबोळी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 21, 2020

सुशिक्षित बेरोजगारांनी कौशल्य विकास विभागाच्या वेबसाईटवर नाव नोंदणी अद्ययावत करावी : ए. बी. तांबोळी


सुशिक्षित बेरोजगारांनी कौशल्य विकास विभागाच्या वेबसाईटवर नाव नोंदणी अद्ययावत करावी : ए. बी. तांबोळी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : राज्य शासनाच्या पुर्वीच्या रोजगार व स्वयंरोजगार व सध्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या कार्यालयात सुशिक्षित बेरोजगारांना नांव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. या उमेदवारांना आपल्या नोंदणीचे अपडेशन करावे लागणार आहे. नोंदणी क्रमांकास आधार क्रमांकही जोडावा लागणार आहे. अन्यथा १५ ऑगस्ट २०२० नंतर नोंदणी रद्द होवू शकते. उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जावून जॉबसिकर ऑप्शनमध्ये नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून नोंदणी अद्ययावत करावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ए. बी. तांबोळी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise