Type Here to Get Search Results !

संपादकीय : राम मंदिर. संजय राऊत, के.पी.शर्मा ओली व हिंदुत्व...


संपादकीय : राम मंदिर. संजय राऊत, के.पी.शर्मा ओली  व हिंदुत्व...
" भगवान राम हे नेपाळी होते. तसेच भारतातील आयोध्या ही नकली आहे, तर खरी आयोध्या नेपाळमध्ये आहे, असा दावा नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी केला आहे. त्यावरती खासदार संजय राऊत यांनी सामना मधून नाराज होऊन आपली तिखट प्रतिक्रिया देताना म्हणतात की," सीतामाईचे माहेर नेपाळ आहे. रामाची पावले त्या भूमीवर उमटली म्हणून ते पहिले हिंदूराष्ट्र ठरले, पण जेथे राम जन्माला आले, ती अयोध्या व हिंदुस्थान मात्र धर्मनिरपेक्ष बनले आहेत. ओली हे हिंदू असले तरी ते चीनचे हस्तक आहेत. त्यामुळे चीनची रखेल असल्याप्रमाणे ओली  यांचे वर्तन असल्याची टीका त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की,' राम व राम मंदिर हा हिंदुस्तानसाठी भावनेचा व तितकाच श्रद्धेचा विषय आहे. के.पी. शर्मा ओली हे व खासदार संजय राऊत दोघे ही स्वतःला हिंदू म्हणून स्वतःच्या.... बडवून घेत आहेत. ओली हे नेपाळचे पंतप्रधान आहेत तर संजय राऊत हे भारताच्या लोकसभेचे खासदार आहेत. या दोन स्वतःला हिंदू धर्मीय समजणाऱ्या विद्वानांच्या मध्ये राम, रामाची जन्मभूमी व आयोध्या यांच्यावरून मतभेद आहेत, हे उघड-उघड जगाला समजले आहे. त्याच बरोबर जे खासदार संजय राऊत हे ज्या देशाच्या लोकसभेचे खासदार आहेत, त्या देशाचे नाव त्यांना माहीत नसावे, हे किती मोठं दुर्दैव आहे . हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असणाऱ्या रामा विषयी जगातील एकमेव हिंदू राष्ट्राचे पंतप्रधान, जे स्वतः कट्टर हिंदू-धर्मीय आहेत, ते आपले मत व्यक्त करतात. म्हणजे त्यांना अजिबात हिंदू धर्माविषयी अभिमान नाही काय..? आणि जे खासदार महोदय धर्मनिरपेक्ष देशात राहतात, आणि केवळ राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतात तरी ही त्यांना हिंदू धर्माविषयी अतिशय अभिमान आहे, असे त्यांचे स्वतःचे मत आहे , हे कसे काय शक्य आहे? शिवाय ते स्वतः हे मान्य करतात, की सीता चे माहेर नेपाळ मध्ये आहे व नेपाळमध्ये रामाची पाऊले उमटली, म्हणून ते जगातील एकमेव हिंदू-राष्ट्र ठरले आहे. मग नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्या विचारात तथ्य असण्याची शक्यता कशी नाकारता येईल ? आज रामाची जन्मभूमी म्हणून ज्या आयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्यासाठी भूमी सपाटीकरण्याचे काम करत असताना काही ठिकाणी बुद्ध मुर्त्या व शिलालेख सापडले आहेत, यावरून तेथे राम मंदिर नाहीतर पूर्वी बुद्ध विहार होते, हे सिद्ध झाले आहे. म्हणून नेपाळचे पंतप्रधान, के.पी. शर्मा ओली यांचे विधानात सत्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते पुढे असेही सांगतात की राम व राम मंदिर हा हिंदुस्थानांतील जनतेच्या भावनेचा व तितकाच श्रद्धेचा विषय आहे.हे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य आहे. खरेतर खासदार साहेबांना हे माहित नाही की जर सगळेच हिंदुस्थानातील लोक हिंदू धर्मीय असतील तर त्यांच्यात जातिभेद का केला जातो? त्यांना समानतेची वागणूक किंवा दर्जा का दिला जात नाही? देशातील सगळेच हिंदू असतील तर त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार का केला जात नाही? कशासाठी सर्वजण हिंदू असताना सुवर्ण व शूद्र हा भेदभाव केला जातो? हिंदुत्वाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या सामाजिक अन्याय, अत्याचाराला व शोषणाला कंटाळूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या विषमतवादी आणि जातीयवादी हिंदू धर्माचा त्याग करून 6 डिसेंबर, 1956 साली बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे या देशातील सर्व दलित व बहुजन हिंदुत्वाचा त्याग करून बौद्ध झालेले आहेत. त्यामुळे त्यांना हे खासदार महाशय हिंदू म्हणून, राम व राम मंदिरासाठी का ग्राह्य धरत आहेत ? तसेच ज्या दिवशी हा देश इंग्रजांच्या पासून स्वतंत्र झाला, त्या दिवसापासून देशाचा राष्ट्रध्वज,  राजमुद्रा, राष्ट्रभाषा, राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय पक्षी व राष्ट्रीय प्राणी इत्यादींच्या माध्यमातून व 26 जानेवारी, 1950 पासून भारतीय संविधानाच्या रूपाने झाला आहे. कारण तीच या भारतदेशाची (हिंदुस्थानची न्हवे) मूळ आदर्श व मानवतावादी संस्कृती होती. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संस्कृतीचे पुनर्जीवन केलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही देशाचं नाव बदलण्याचा किंवा हिंदुत्ववादी बनवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला, तरी त्याचा काडीमात्र ही फायदा होणार नाही. आपल्याला हिंदुस्तान या शब्दाचा अर्थ ही कळत नसेल, तर मात्र अजब गोष्ट आहे. हिंदुस्तान या शब्दाचा अर्थ, सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांची वस्ती असा आहे.'सिंधू' या शब्दापासून ' हिंदू' हा शब्द तयार झाला आहे. जेव्हा ईराणी लोकांच्या भारतात येण्या-जाण्या मुळे भारतातील 'स' ध्वनीचा उच्चारण  इराणमध्ये उष्ण वातावरणामुळे 'ह'असा होतो. त्यामुळे ' सिंधू ' शब्दाचा ' हिंदू ' शब्द तयार झाला आहे. असे अनेक संस्कृत शब्द इराणमध्ये गेल्यानंतर ' स'चे 'ह' मध्ये रूपांतर होऊन आलेले आहेत. त्यामध्ये संस्कृत 'सहस्त्र' या शब्दापासून ' हजार' हा शब्द तयार झाला आहे. तर दुसरा शब्द 'सप्ता' या संस्कृत शब्दापासून 'हप्ता' हा शब्द तयार झाला आहे. म्हणून 'सिंधुस्थान' पासून 'हिंदुस्थान' हा स्थान-वाचक शब्द तयार झाला आहे. तो धर्मवाचक नाही. याचा थोडा-फार अभ्यास, जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात, त्यांनी करायला हरकत नाही. त्यामुळे धर्मवादी, दैववादी व जातीयवादी लोकांना एक नम्र निवेदन आहे, की त्यांनी जातीयवाद, धर्मवाद आणि दैववाद बाजूला ठेवून, एकजुटीने कोरोना सारख्या संकटाला देशातून बाहेर हाकलून देण्यासाठी आपली शक्ती पणाला लावावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies