Type Here to Get Search Results !

संपादकीय : रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, कोरोनाला पळवून लावा...!!!


संपादकीय : रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, कोरोनाला पळवून लावा...!!! 



चीन मधून पाहुणा म्हणून आलेल्या कोरोनाने हळूहळू आपल्या संपूर्ण भारत देशात पाय पसरायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे संपूर्ण भारत आज भीतीच्या छायेखाली वावरत आहे. 


कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर त्यापेक्षा कितीतरी पटीने लोकांनी कोरोनावर मात केलेली आहे. कोरोनाचे बळी गेलेल्या लोकांचा सर्वसाधारण अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आलेले आहे की, हे सर्व लोक शारीरिक व मानसिक  दृष्टीने कमकुवत आहेत. शारीरिक दृष्टीने कमकुवत म्हणजे असे लोक की, त्यांच्याकडे कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिकारक शक्ती नव्हती. कदाचित वय जास्त झाल्यामुळे किंवा पूर्वीचे नियमित केव्हा गंभीर स्वरूपाचे आजार असल्यामुळे त्यांच्या कडील प्रतीकारक शक्ती कमी झालेली असण्याची शक्यता होती. अशावेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला ही माणसं अर्धी शारीरिक प्रतिकारक शक्ती च्या अभावाने व अर्धी भीतीने मृत्यूला जवळ करत असतात. दुसरी गोष्ट अशी आहे की, जरी कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झाला असला तरी या लोकांची मानसिकता भक्कम नव्हती, मानसिक दृष्टीने घाबरणारे व निगेटिव्ह विचार करणारे हे लोक होते, असे निदर्शनास येत आहे. म्हणजेच जरी एखाद्याला संसर्ग झाला, तर, तो व्यक्ती शारीरिक  आणि मानसिक दृष्टीने खंबीर असेल तर कोरोनाचे विषाणू त्या माणसाचे काही  बिघडवू शकत नाहीत. 



शारीरिक दृष्टीने भक्कम म्हणजेच त्याच्याकडे प्रतिकारक शक्ती चांगली असते व मानसिक दृष्टीने भक्कम म्हणजे न घाबरणारे किंवा सकारात्मक विचार करणारे लोक होय. मानसिक प्रतिकारक शक्ती ही त्या व्यक्तीच्या मनावर व विचार करण्यावर अवलंबून असते, तर शारीरिक प्रतिकारक शक्ती ही त्याने केलेल्या अहरावर अवलंबून असते. शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असणारी सर्व जीवनसत्त्वे व सकस आहार युक्त जेवण नियमितपणे करणे आवश्यीक असते. या सकस आहारमध्ये मध्ये दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मटन, मासे यांचा जास्तीत-जास्त समावेश असला पाहिजे. मात्र आपल्या देशातील विशेषत: महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता देव-धर्माच्या व अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यामुळे उपवास तपास करीत आहे. तसेच अंडी, मटण, मांस यांचा जीवनामध्ये वापर करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अशा देव-धर्म व अंधश्रद्धाळू व्यक्तींची एक तर मानसिकता कमकुवत असते, त्याचबरोबर दुसरी बाब म्हणजे शरीरात प्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आहारापासून ते दूर असतात. त्यामुळे जर त्यांच्या दुर्दैवाने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर, त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 



म्हणून महाराष्ट्रातील व देशातील सर्व लोकांनी आपल्या आहारामध्ये नियमितपणे दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मटण आणि मासे यांचा नियमितपणे वापर करावा, अशी अपेक्षा आहे. सध्या श्रावण महिना सुरु झाल्यामुळे अनेक अंधश्रद्धाळू लोक व देव-धर्म मानणारे लोक श्रावण महिन्यामध्ये जास्तीत-जास्त उपवास करतात. तसेच मांसाहारी भोजनाचा महिनाभर जाणीवपूर्वक त्याग करतात. अशा लोकांनी किमान एवढ्या वर्षासाठी तरी उपवास तपास व देव-धर्म यापासून सुटका करून घ्यावी व नियमितपणे आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थ सोबतच मांसाहार ही करावा. जर आपले शरीर तंदुरुस्त व अन्न पाण्याने संतुष्ट असेल तर आपण आपल्या शरीरात बाहेरून प्रवेश करणाऱ्या विविध आजारांच्या विषाणूंचा प्रतिकार करू शकतो. त्यामुळे आपण शरीराबरोबरच मनानेही भक्कम बनतो. 



कारण ' सुदृढ शरीरात सुदृढ आत्मा निवास करतो : असे म्हणतात, ते अगदी बरोबर आहे. म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये उपवास व देव-धर्म करणाऱ्या सर्व नागरिकांनी जर स्वतःला व स्वतःच्या कुटुंबांना कोरोना पासून सुरक्षित ठेवायचं असेल तर, त्यासाठी श्रावण महिन्या च्या सर्व उपवासाचा त्याग करणे व दुधापासून बनवलेले पदार्थ,अंडी, मटण, मासे खाणे आवश्यक आहे. जे लोक पहिल्यापासूनच पूर्णत: शाहाकरी आहेत, त्यानी आपल्या आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या व कडधान्य यांचा जास्तीत-जास्त वापर करावा. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत दररोज सायंकाळी झोपण्यापूर्वी सर्व कुटुंबीयांनी गरम पाण्याची वाफ नाकातून घेऊन तोंडातून सोडावी व तोंडातून घेऊन नाकातून सोडावी. हा प्रयोग किमान चार ते पाच वेळा नियमित  करावा. तसेच जे शाकाहारी व मांसाहारी आहार घेतात, त्यांनी आपल्या रोजच्या आहारामध्ये मांसाहारी पदार्था बरोबरच पालेभाज्या व कडधान्य यांचा ही जास्तीत-जास्त अंतर्भाव करावा.




एकंदरीत कोरोना पासून स्वतःला स्वतःच्या कुटुंबाला व समाजाला वाचवण्यासाठी आपण आपलं शरीर आणि मन दोन्हीही तंदुरुस्त ठेवलं पाहिजे. शरीर व मन तंदुरुस्त ठेवून आपली रोगप्रतिकारक शक्ती जास्तीत जास्त वाढवली पाहिजे. कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी धार्मिक व अंधश्रद्धा यांच्याशी निगडित असणाऱ्या बाबी किमान  एका वर्षासाठी तरी थोड्याशा बाजूला ठेवल्या पाहिजेत, तरच आपण कोरोनावरती सहजासहजी मात करून स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला व देशातील जनतेला सुरक्षित ठेवू शकतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies