डॉ. राजेंद्र मोडासे यांचा “कोव्हीड योध्दा" म्हणुन सन्मान - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 13, 2020

डॉ. राजेंद्र मोडासे यांचा “कोव्हीड योध्दा" म्हणुन सन्मान

dr rajendr modase

डॉ. राजेंद्र मोडासे यांचा “कोव्हीड योध्दा" म्हणुन सन्मान
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला :  कोरोना काळात ईश्वरी अंशाला "कोविड योध्दा" असे म्हणतात या संकटकाळात स्वत:च्या कुटूंबासोबत अनेकांच्या सुरक्षेसाठी सेवाभावाने काम करणारे स्वत:च्या आरोग्याची जोखिम उचलत इतरांच्या आरोग्यासाठी झटणारे भारतीय जैन संघटनेचे म्हसवड शहराध्यक्ष डॉ.राजेंद्र मोडासे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती ने "कोविड योध्दा" म्हणुन सन्मान केला.
जनकल्याण समितीचे केदार कुलकर्णी व मुकुंदराव आफळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देवुन गौरवण्यात आले. यावेळी रामचंद्र नरळे, बी.एम. अब्दागिरे, संजय टाकणे, प्रशांत दोशी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise