डाळिंब मार्केटमध्ये गाढवांचा हैदोस ; ज्यांची मालकीचे गाढवे आहे त्यांनी घेवून जावेत अन्यथा कायदेशीर कारवाईचा मार्केट कमिटीचा इशारा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 31, 2020

डाळिंब मार्केटमध्ये गाढवांचा हैदोस ; ज्यांची मालकीचे गाढवे आहे त्यांनी घेवून जावेत अन्यथा कायदेशीर कारवाईचा मार्केट कमिटीचा इशारा


डाळिंब मार्केटमध्ये गाढवांचा हैदोस ; ज्यांची मालकीचे गाढवे आहे त्यांनी घेवून जावेत अन्यथा कायदेशीर कारवाईचा मार्केट कमिटीचा इशारा  
माणदेश एक्सप्रेस न्युज 

आटपाडी/प्रतिनिधी : कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी येथील डाळींब सौदे ठिकाणी गाढवांनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातला असून चांगल्या डाळींबाचे नुकसान करीत असल्याने ज्यांची गाढवे आहेत त्यांनी ती तातडीने घेवून जावेत अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी येथे डाळिंबाचे मोठे मार्केट आहे. सदर मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाची आवक-जावक होत असते. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची घेतलेली डाळिंबे क्रेट मध्ये भरून पुढील मार्केटला जाई पर्यंत आहे त्या ठिकाणी ठेवली जातात. परंतु रात्रीच्या वेळेला मार्केटमध्ये केव्हाही गाढवे शिरून डाळिंबाचे नुकसान करीत असल्याने व्यापाऱ्या बरोबर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

त्यामुळे ज्यांची कोणाच्या मालकीचे गाढवे आहेत त्यांनी मार्केट यार्डामधे गाढवे सोडु नयेत. अन्यथा संबंधित मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सचिव शशिकांत जाधव म्हणाले. 


No comments:

Post a Comment

Advertise