राम राज्याठिकाणी गुंडाराज्याची निर्मिती : राहुल गांधी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 22, 2020

राम राज्याठिकाणी गुंडाराज्याची निर्मिती : राहुल गांधी


राम राज्याठिकाणी गुंडाराज्याची निर्मिती : राहुल गांधी 
नवी दिल्ली : भाजप सरकारकडून रामराज्य निर्मिती करण्याची घोषणा करणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज सुरु असल्याची टिका काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. टिवट करत त्यांनी ही टिका केली आहे.उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील पत्रकार विक्रम जोशी यांनी त्यांच्या भाचीची छेड काढणाऱ्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर सोमवारी (दि. 20 जुलै) रात्री काही हल्लेखोरांनी हल्ला करत त्यांच्यावर गोळीबार केला होता. यात त्यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. याबाबात टिवट करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टिका केली.

No comments:

Post a Comment

Advertise