आटपाडीत अॅक्वाचे पाणी विकणारा कोरोनागस्त ; अनेकांच्या घशाला पडली कोरड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 28, 2020

आटपाडीत अॅक्वाचे पाणी विकणारा कोरोनागस्त ; अनेकांच्या घशाला पडली कोरड


आटपाडीत अॅक्वाचे पाणी विकणारा कोरोनागस्त ; अनेकांच्या घशाला पडली कोरड 
माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये एका ३० वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी शहरामध्ये एका ३० वर्षीय युवकाचे शहरामध्ये अॅक्वाचे पाणी विकण्याचा व्यवसाय आहे. सदर युवकाच्या अॅक्वाच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवसायाबरोबरच त्याची स्वत:ची चारचाकी गाडी असून सदर गाडी तो भाड्याने देत होता. सदर गाडीने त्याने बाहेर गावची अनेक भाडी केलेली आहेत. 

त्यामुळे बाहेर गावाला गेल्यावरच कोणत्यातरी कोरोनाग्रस्ताच्या संपर्कामध्ये आल्यानेच त्याला कोरोना झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्याचा शहरामध्ये शुद्ध पिण्याच्या थंड पाण्याचा व्यवसाय असून या ठिकाणी तो अनेकवेळ बसत असल्याने याठिकाणाहून पिण्याचे पाणी घेवून जाणाऱ्यांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे.


No comments:

Post a Comment

Advertise