दिलासादायक बातमी : खरसुंडीतील त्या ३३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह : तर दोघांचे अहवाल प्रलंबित - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 30, 2020

दिलासादायक बातमी : खरसुंडीतील त्या ३३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह : तर दोघांचे अहवाल प्रलंबित


दिलासादायक बातमी : खरसुंडीतील त्या ३३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह : तर दोघांचे अहवाल प्रलंबित
माणदेश एक्सप्रेस न्युज

खरसुंडी/वार्ताहर : खरसुंडी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ३३ जणांचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत. दि.२८ रोजी खरसुंडी येथील एका गलाई व्यावसायिकास कोरोनाची लागण झाली होती.

पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात एकूण ३५ जण होते. त्यापैकी ३३ जणांचे स्लॅब प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तपासण्यासाठी मिरज कोविड सेंटरला पाठवण्यात आले होते. 

हे ३३ जणांचे अहवाल आज निगेटिव्ह आले असून उर्वरित दोघांचे स्लॅब पुणे येथील एका खाजगी लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठवले असून दोन अहवाल प्रलंबित असल्याची माहिती खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश जाधव यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise