तणावमुक्त राहण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांनी केला डान्स - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 21, 2020

तणावमुक्त राहण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांनी केला डान्स


तणावमुक्त राहण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांनी केला डान्स
बंगळुरू : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून परिस्थिती गंभीर झाली आहे. यातच कोरोनामुळे लोकांमध्ये भितीचे वातवरण निर्माण झाले आहे. कर्नाटकातील कोरोना रुग्णांनी कोरोना’ची भीती दूर करण्यासाठी रुग्णालयात डान्स केला आहे. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोरोनाबाधित मात्र, लक्षणे नसलेल्या रुग्णांनी कोविड केअर सेंटरमध्ये डान्स केला. यावेळी प्रत्येकाने एका-एका गाण्यावर डान्स केले. कर्नाटकमध्ये कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत असताना, हा व्हिडिओ दिलासा देणारा आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या दहशतीत आहे. अशा परिस्थिती तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न या रुग्णांनी केला.

No comments:

Post a Comment

Advertise