आटपाडीमध्ये दूषित पाणीपुरवठा, जनतेचे आरोग्य धोक्यात.... - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 14, 2020

आटपाडीमध्ये दूषित पाणीपुरवठा, जनतेचे आरोग्य धोक्यात....


आटपाडीमध्ये दूषित पाणीपुरवठा, जनतेचे आरोग्य धोक्यात....
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील आटपाडी ग्रामपंचायतीच्या वार्ड नंबर पाच मध्ये दूषित, दुर्गंधीयुक्त, पिण्यास अयोग्य व आरोग्यास घातक पाणीपुरवठा पाठीमागील सहा महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील सर्वसामान्य जनतेला अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात वार्ड क्रमांक पाच मधील जनतेने दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार वार्डातील ग्रामपंचायत सदस्यांना सांगितली होती, मात्र त्यांनी या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सहा महिन्यापासून या परिसरातील लोकांना दुषित पाणी येत आहे. त्यामुळे या वॉर्डात अनेक लोकांना दूषित पाण्यापासून आजार झालेले आहेत. सदर ठिकाणी होणारा दूषित पाणी पुरवठा बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने पावले उचलावीत अन्यथा कोरोना सोबतच परिसराला पुन्हा भयानक साथीच्या रोगाला सामोर जावे लागेल

No comments:

Post a Comment

Advertise