कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांचे यंत्रणांना प्रशिक्षण संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 28, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांचे यंत्रणांना प्रशिक्षण संपन्न
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांचे यंत्रणांना प्रशिक्षण संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज

सांगली : कोरोना बाधित रूग्णांना विना अडथळा उपचार मिळावेत यासाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल्स व अधिग्रहित करण्यात आलेल्या हॉस्पीटल्समध्ये कोणत्या हॉस्पीटल्समध्ये किती बेडस् उपलब्ध आहेत याची माहिती त्वरीत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यात आले आहे. यामध्ये दररोज सकाळी 10 व सायंकाळी 5 असे दिवसातून दोन वेळा अद्ययावत केले जाणार आहे. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात अधिग्रहित रूग्णांलयांचे डॉक्टर्स, प्रशासकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे कर्मचारी, जिल्हा परिषद नियंत्रण कक्षातील कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त् अधिकारी राजेंद्र गाडेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी सुनिलकुमार केंबळे, अप्पर जिल्हा सूचना अधिकारी यासीन सय्यद, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक डॉ. खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतील क्लेमचा लवकर निपटारा व्हावा यासाठी प्रत्येक हॉस्पीटलमध्ये योजनेंतर्गत उपचार घेतलेल्या रूग्णांची बिले विहीत वेळेत दाखल होतील याची खबरदारी घ्यावी, असेही अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी सांगितले. 
या कार्यशाळेत अप्पर जिल्हा सूचना अधिकारी यासीन सय्यद यांनी बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम बाबत माहिती देत असताना 10 तालुक्यांमधील कोविड-19 उपचारासाठी असणारी कोविड केअर सेंटर, अधिग्रहित हॉस्पीटल, त्यामधील बेडस् ची एकूण संख्या आणि उपलब्धता, पेशंट मुव्हमेंट आदिंबाबत या प्रणालीमध्ये सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून सदरची माहिती दिवसातून दोन वेळा अद्ययावत करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी फॅसिलिटी ॲपबद्दल माहिती दिली. यामध्ये रूग्णाला दिली जाणारी ट्रिटमेंट, रूग्णांची स्थिती, गंभीर, सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांची संख्या, व्हेन्टिलेटर्सची उपलब्धता आदिंबद्दल या प्रणालीमध्ये माहिती अंतर्भूत असल्याचे सांगितले. तसेच सदरची प्रणाली विहीत कालावधीत अपडेट ठेवणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त् अधिकारी राजेंद्र गाडेकर यांनी अधिग्रहित करण्यात आलेल्या हॉस्पीटल्सनी आवश्यक सामग्री व उपचारांचे दर हे शासनाने विहीत केलेल्या दरांप्रमाणेच असणे आवश्यक असून कोणत्याही परिस्थितीत रूग्णांवर अनावश्यक आर्थिक बोजा लादला जाणार नाही याची दक्षता कटाक्षाने घ्या, असे आवाहन केले.
 महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक डॉ. खेडेकर यांनी संबंधित योजनेबद्दल माहिती दिली.


No comments:

Post a Comment

Advertise