Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यातील पांढरेवाडी-आटपाडी परिसरात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात


आटपाडी तालुक्यातील पांढरेवाडी-आटपाडी परिसरात 
कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात
माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : आटपाडी तालुक्यातील पांढरेवाडी-आटपाडी परिसरात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिली.
कंटेनमेंट झोन - पांढरेवाडी आटपाडी गावाच्या उत्तरेस दत्तात्रय सुखदेव चव्हाण यांची शेतजमीन, दक्षिणेस आटपाडी-बोंबेवाडी रोड मरीमाता मंदिर, पूर्वेस मारूती मंदिर, पांढरेवाडी शहाजी निवृत्ती जाधव यांची शेतजमीन, पश्चिमेस शिवाजी आनंदा वाघमोडे यांची शेतजमीन. या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. 
बफर झोन - पांढरेवाडी आटपाडी गावाच्या उत्तरेस शुक्र ओढापात्र हद्द, दक्षिणेस रावसाहेब राजाराम चव्हाण कॅनाल हद्द, पूर्वेस शहाजी सोपान पाटील, कोळेकर मळा, पश्चिमेस हणमंत राजाराम पाटील शेतजमीन पाटील मळा.
सदर भागांमध्ये सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies