विटा-मुजावरवस्ती येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 24, 2020

विटा-मुजावरवस्ती येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात


विटा-मुजावरवस्ती येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात
माणदेश एक्सप्रेस न्युजसांगली : खानापूर तालुक्यातील विटा-मुजावरवस्ती परिसरात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिली.कंटेनमेंट झोन - पूर्वेस विटा साळशिंगे रोड, पश्चिमेस विठ्ठल जगन्नाथ सुडके यांच्या घरापर्यंत, दक्षिणेस नवाज रफिक मुजावर यांचे घर, उत्तरेस रजिया दस्तगीर मुजावर यांचे घर. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन - पूर्वेस विटा साळशिंगे रोड, पश्चिमेस सर्व्हे नं. 407 ची हद्द, दक्षिणेस मंथन मेटकरी यांच्या घरापर्यंत, उत्तरेस विटा गार्डी शीव.सदर भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिले आहेत

No comments:

Post a Comment

Advertise