खानापूर तालुक्यातील वेजेगाव व माधळमुठी येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात ; पहा कंटेनमेंट झोन कोठे-कोठे आहेत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 21, 2020

खानापूर तालुक्यातील वेजेगाव व माधळमुठी येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात ; पहा कंटेनमेंट झोन कोठे-कोठे आहेत


खानापूर तालुक्यातील वेजेगाव व माधळमुठी येथे  कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात
सांगली : खानापूर तालुक्यातील वेजेगाव व माधळमुठी गावामध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिली.
कंटेनमेंट झोन वेजेगाव - पूर्वेस यशवंत भिकू यादव यांच्या घरापर्यंत (मिळकत नं. 806), पश्चिमेस संजय विलास देवकर यांच्या घरापर्यंत (मिळकत नं. 435), दक्षिणेस बजरंग जगन्नाथ क्षिरसागर यांच्या घरापर्यंत (मिळकत नं. 508), उत्तरेस बापूसो पांडूरंग विभूते यांच्या घरापर्यंत मिळकत (मिळकत नं. 415). या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन - पूर्वेस संदिप काशिनाथ जाधव यांच्या घरापर्यंत, पश्चिमेस वेजेगाव बस स्टॉप, दक्षिणेस अरविंद केरू देवकर यांच्या घरापर्यंत, उत्तरेस श्रीरंग आनंद खरात यांच्या घरापर्यंत.
कंटेनमेंट झोन माधळमुठी - पूर्वेस तुळशीराम पांडूरंग निकम यांच्या घरापर्यंत (घर नं. 389), पश्चिमेस दादासो बाळू सावंत यांच्या घरापर्यंत, दक्षिणेस पितांबर ज्ञानु सावंत यांच्या घराच्या समोर रस्त्यापर्यंत (घर नं. 116), उत्तरेस दत्ताजीराव बापू सावंत (घर नं. 411) सिध्देश्वर जगन्नाथ सावंत यांच्या घरापर्यंत (घर नं. 586). या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन - पूर्वेस तुकाराम सोपान भगत यांच्या घरापर्यंत, पश्चिमेस दत्ता मारूती भारते यांच्या घरापर्यंत, दक्षिणेस यशवंत तुळशीराम सावंत यांच्या घरापर्यंत, उत्तरेस जोतीराम जगू सावंत यांच्या घरापर्यंत.
सदर भागांमध्ये सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise