Type Here to Get Search Results !

मेरीमाता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसवड विद्यालयाची उज्वल परंपरा ; सलग १५ वर्षे दहावीचा १००टक्के निकाल


मेरीमाता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसवड विद्यालयाची उज्वल परंपरा ; सलग १५ वर्षे  दहावीचा १००टक्के निकाल
माणदेश एक्सप्रेस न्युज

म्हसवड/अहमद मुल्ला : मेरीमाता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसवड या विद्यालयाने  सलग १५ वर्षे १००टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत एस.एस.सी (१०वी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या विद्यालयात मार्च. २०२० मध्ये  पार पडलेल्या एस.एस.सी. परीक्षेला एकूण ५२ विद्यार्थी बसले होते. पैकी सर्व  ५२ विद्यार्थी डिस्टींगशन मध्ये  उत्तीर्ण  झाले. 

यामध्ये  आमले अथर्व  आण्णासाहेब याने  ९७.८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला तर शिंगटे ओंकार एकनाथ याने ९७.२  टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर पाठक अथर्व मिलिंद  व पवार अनिकेत अरुण यानी प्रत्येकी ९६ टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळवला. एकूण निकालात २८ विद्यार्थी ९० टक्याच्यावर,२३ विद्यार्थी ८०  टक्क्याच्या वर तर १ विद्यार्थी ७७ टक्के मार्क मिळवून उत्तिर्ण झाले. 

मेरी माता हायस्कूल व जुनि.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उतुंग यशाबद्दल व १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल नगराध्यक्ष तुषार विरकर, नगरसेवक धनाजी माने, बाबुराव माने, फादर जॉमी, फादर जेरी, फादर फ्रांसिस, फादर एमील, सिस्टर हिल्डा  सर्व शिक्षक,कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे  अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies